
लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॉंग्रेसने निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासून हा मतदारसंघ पिंजून काढला. आमदार धीरज देशमुख यांच्यासह माजीमंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, दीपशिखा देशमुख आदींनी गावोगाव गाठीभेटी-मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपला सूर गवसला नसल्याने पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.