
महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीने विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवले आहे. परंतु, मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार, याचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. तसेच गृहमंत्री पदावरुन देखील शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेंच सुरु आहे. अशा अनिश्चिततेच्या काळात एकनाथ शिंदे यांचा दरेगाव दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या दौऱ्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.