
पुणे: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) विरोधातील आत्मक्लेष आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला भेट देत पवार यांनी समाजातील सर्वसामान्य लोकांनीही जागृती व उठाव करण्याची गरज व्यक्त केली.