सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएम यावेळी नक्कीच विजयाचा झेंडा फडकवेल, असा विश्वास एमआयएमचे शहराध्यक्ष तथा शहर मध्यचे उमेदवार फारुक शाब्दी यांनी व्यक्त केला. गेल्या दोन निवडणुकांमध्ये एमआयएमने दमदार कामगिरी केली आहे. .२०१४ च्या निवडणुकीत येथे एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाची ३७ हजार १३८ तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची ३८ हजार ७२१ मते एमआयएमला मिळाली आहेत. गेल्या पाच वर्षात आम्ही या मतदारसंघात काम केले आहे. काम करत असताना सर्व जाती-धर्माला सोबत घेतले आहे. या कामाची पोचपावती म्हणून शहर मध्यमधील मतदार यावेळी आम्हाला नक्कीच देतील, असा विश्वासही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केला आहे.एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी, तेलंगणाचे आमदार अकबरुद्दिन ओवेसी यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग सोलापुरात आहे. पक्षात कोण आहे, कोण राहिला, कोण गेला, या पेक्षाही सोलापुरातील मोठा वर्ग ओवेसी व एमआयएमवर प्रेम करतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. .सोलापूर शहरातील तीन जागा व अक्कलकोट येथे निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू आहे. खासदार ओवेसी यांनी राज्यातील पाच जणांची उमेदवारी जाहीर केली. या पाच जणांमध्ये माझाही समावेश आहे, हे माझे भाग्य व सोलापूरकरांचे प्रेम असल्याचेही शहराध्यक्ष शाब्दी यांनी सांगितले. उर्वरित जागांसंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होईल. या विधानसभा निवडणुकीत एमआयएम आपली ताकद नक्कीच दाखवेल, असा विश्वासही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.