Aheri Vidhan Sabha elections 2024
Aheri Vidhan Sabha elections 2024sakal

Aheri Assembly Election 2024 : अहेरी विधानसभा बाप-लेकीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष, कुणीही जिंकले तरी आमदारकी घरातच राहणार!

Aheri Vidhan Sabha Election 2024 : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत या निवडणुकीत बाप-विरुद्ध लेक असा सामना बघायला मिळणार आहे.
Published on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत या निवडणुकीत बाप-विरुद्ध लेक असा सामना बघायला मिळणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या अहेरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून उमेदवार म्हणून लढणार आहे. भाग्यश्री आत्राम यांनी सोमवार अहेरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन करीत धर्मरावबाबा आत्राम आपले नामांकन दाखल करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com