
हिंगोली : विधानसभा निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली असून लवकरच वातावरण तापणार आहे. हिंगोली विधानसभा युतीत भाजपकडे आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करून युतीने बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केला नाही. उमेदवारी कुणाला जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.