
बीड : एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेची ताकद हळूहळू घटवत पक्षाचा ‘वाघ’ बीडच्या पिंजऱ्यात कैद केला होता. आता या एकमेव जागेवरही नव्याने मित्रपक्ष झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने कब्जा केला आहे. तर, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर ताकद क्षीण झालेल्या कॉँग्रेसची परळीतील एकमेव जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कायमची आपल्याकडे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचा ‘बाण’ आणि महाविकास आघाडीतील मोठा पक्ष कॉँग्रेसचा ‘पंजा’ या विधानसभा निवडणुकीत नसेल.