Pusad Vidhan Sabha Election : पुसद विधानसभा मतदारसंघात इंद्रनील नाईक दुसऱ्यांदा निवडणुकीत उतरले आहेत. भाजपचे माजी आमदार निलय नाईक आणि आदिवासी मतदारांचे विभाजन या निवडणुकीला गडद रंग देत आहेत.
पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद विधानसभा मतदारसंघात नव्या पिढीचे नाईक घराण्याचे शिलेदार विद्यमान आमदार इंद्रनील मनोहर नाईक हे आपले नशीब दुसऱ्यांदा आजमावत आहेत.