Jalna Assembly Election 2024 : जालना विधानसभा जिल्ह्यात १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात
Jalna Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. छाननी प्रक्रियेनंतर मतदारसंघात एकूण २२८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.
जालना : विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. छाननी प्रक्रियेनंतर मतदारसंघात एकूण २२८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ११९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.