जत : ‘‘जतमध्ये आम्ही कुणाला शत्रू मानून निवडणूक लढलो नाही, तर इथला दुष्काळ, ऊसतोडीचा कोयता, बेरोजगारी या प्रश्नावर मतदारांमध्ये गेलो. इथल्या गरीब व पिचलेल्या नागरिकांना हे मुद्दे पटल्यानेच आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना ३९ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. २३ नोव्हेंबरलाच राजकीय आरोप-प्रत्यारोप संपलेत. यापुढे तालुक्यात कुणाच्या जिरवाजिरवीचे राजकारण न करता विकासाचे समाजकारण करणार आहोत,’’ अशी माहिती माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी पत्रकार बैठकीत दिली.