

कल्याण ग्रामीणच्या विजयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे राजेश मोरे यांनी इतर दोन उमेदवारांना मागे टाकत कल्याण ग्रामीण विजयाचा झेंडा फडकावलाय. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुभाष भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजू पाटील यांचा पराभव केलाय. राजेश मोरे तब्बल ५१ हजार मतांनी विजयी झालेत.
विधानसभा निवडणूक प्रचारास काही दिवस शिल्लक राहिले असताना कल्याण ग्रामीणमध्ये राजकीय वातावरण तापलं होतं. येथे मनसे, शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट अशी तिरंगी लढत झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने उमेदवार देताच येथील लढतीला एक वेगळीच रंगत आली. मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर व शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यात प्रमुख लढत झाली.