"कोरेगाव (Koregaon Assembly Election Results) मतदारसंघातून मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. काही मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले."
सातारारोड : निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने कोरेगाव मतदारसंघात चर्चा होती, त्यानुसार मी शंभर टक्के निवडून येईन, अशी खात्री व्यक्त केली जात होती, तरीही पराभवाला सामोरे जावे लागले, हा कार्यकर्त्यांसाठी धक्का आहे. ईव्हीएम मशिनपासून व्यक्त केल्या जात असलेल्या अनेक शंका व चर्चांमुळे मतदार देखील संभ्रमात आहेत. मात्र, भविष्यकाळात मी सदैव तुम्हा सर्वांसोबत आहे. कोणीही अस्वस्थ राहू नये. आपण सर्व एकसंधतेने राहून पुन्हा उभारी घेऊ, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.