Kudal Assembly Election 2024 Results : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत अखेर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा ८ हजार १७६ मताधिक्याने पराभव करीत या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला. या विजयामुळे नीलेश राणे हे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या २०१४ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा दहा वर्षांनंतर या मतदारसंघाचे आमदार झाले.
कुडाळ मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कुडाळ हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.