
लातूर : जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात १९२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या वेळेसची निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असणार आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व राहणार आहे. त्यात सध्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे. चार नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय गणिते घालून अशा उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांना मनधरणी करावी लागणार आहे.