
लातूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. प्रचारासाठी आता जेमतेम १० दिवस उमेदवारांच्या हातात शिल्लक राहिले आहेत. कमी वेळेत अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आणि महायुतीतील उमेदवारांच्या ‘गृहमंत्री’ प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. गाठीभेटी, संवाद बैठका, पदयात्रा, मेळावा घेऊन त्या आपल्या पतीसाठी मतदारराजाकडे साकडे घालत आहेत.