

Facility to apply from home on 'MahaDBT 2.0' portal.
Sakal
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'लेक लाडकी' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलींच्या जन्मापासून ते वयाच्या १८ वर्षांपर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेसाठी आता सरकारी कार्यालये किंवा अंगणवाडी केंद्रांचे हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नाही. राज्य सरकारने या योजनेचा अर्ज थेट 'महाडीबीटी २.०' (MahaDBT 2.0) पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.