आमदार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर मोहिते आणि शिंदे यांच्यातील गेल्या पंधरा वर्षानंतरचा राजकीय संघर्ष मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंढरपूर : माढ्याची उमेदवारी 'तुतारी'कडून मिळवण्यासाठी प्रसंगी मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेऊ, असे सूचक वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी आज केले. दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी रणजीत शिंदे (Ranjit Singh Shinde) हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आमदार बबन शिंदे यांनी सांगितले.