
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काल मंगळवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी आघाडी असताना देखील नेते आमने-सामने आले आहेत. तर काही ठिकाणी धक्कादायक घडामोडी घडल्या. नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते आता मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत.
मलिक यांनी अर्ज दाखल करताच त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. भाजपनेते आशिष शेलार यांनी मलिकांचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार देखील असणार आहे. नवाब मलिकांना भाजप आणि शिंदे गटाचा विरोध असताना अजित पवारांनी त्यांना मैदानात का उतरवले असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्तेत आला आहे.