Sharad Pawar
Sharad Pawar speaking at a Baramati event, criticizing BJP and Ajit Pawar over party and economic issues.esakal

Sharad Pawar: "मी काढलेला पक्ष माझ्याकडूनच काढून घेतला, उभ्या आयुष्यात..."; शरद पवारांचे तुफान भाषण अजित पवारांवर पहिल्यांदा बोलले!

Sharad Pawar’s Baramati Speech Targets Ajit Pawar and BJP : बारामतीमध्ये निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्याची पारंपरिक प्रथा यावेळी देखील पवारांनी कायम ठेवली. “गेल्या ५५ वर्षांत निवडणूक लढताना इथूनच सुरुवात केली आहे. यावेळेस देखील मतदारांचा आशीर्वाद लाभेल, याची मला खात्री आहे,” असे शरद पवार म्हणाले.
Published on

Sharad Pawar’s Baramati Speech: बारामतीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध पवार असा अनोखा संघर्ष पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी युगेंद्र यांच्या प्रचारासाठी कान्हेरी येथे सभा घेतली. यावेळी पक्षाच्या फुटीबाबत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आणि भाजपसह अजित पवारांवर जोरदार टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com