"काही वर्षांपूर्वी पुरोगामी व काँग्रेसवादी विचारसरणीने ‘ईव्हीएम हटाव-देश बचाव’, चळवळ उभी केली होती. कालच्या निकालावरून खरोखरच यामध्ये काही गोंधळ आहे का, अशी शंका येत आहे.’’
कुंडल : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) ताज्या निकालावरून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रमामध्ये (ईव्हीएम) खरोखरच काही गोंधळ आहे का, अशी शंका येते, असे प्रतिपादन आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांनी केले. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या समाधिस्थळी अभिवादनासाठी आले असता त्यांचा कारखाना कार्यस्थळी सत्कार करण्यात आला.