साहेब आमचे दैवत आहेत, साहेबांशी आमची निष्ठा आहे, साहेब आमच्या हृदयात अन् खिशातही आहेत, असे मकरंद पाटील सर्वत्र सांगताहेत.
वाई : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ज्यांना भरभरून दिले ते पक्ष फुटल्यानंतर सोडून गेले, अशा गद्दारांना पाडाच पाडा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे सांगितले. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ वाईत भाजी मंडई येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते.