
भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर आता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपाकडून अधिकृत कॉल आला आहे. फुंडकर कुटुंबासाठी हा क्षण गौरवास्पद आहे. यापूर्वी भाऊसाहेब फुंडकर यांनी कृषिमंत्री म्हणून काम केले होते. विधानपरिषदेवर असताना २०१८ मध्ये त्यांच्या निधनानंतर राजकारणात आकाश फुंडकर यांनी राजकीय वारसा चालवला. आता ते मंत्रिपदी विराजमान होण्याच्या तयारीत आहेत.