Cabinet Expansion: "ज्या प्रश्नासाठी आम्ही लढलो, रक्त सांडलं..."; मंत्रिपदासाठी फोन न आल्यामुळे सदाभाऊंनी व्यक्त केली नाराजी
Sadabhau Khot reaction on cabinet expansion: सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या संघर्षशील प्रवासाचा उल्लेख करत सत्तेत असतानाही संघर्ष थांबला नसल्याचे स्पष्ट केले.
महायुती सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज नागपुरात पार पडला. यावेळी अनेक नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, तर काहींच्या अपेक्षा भंग झाल्या. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली.