
Maharashtra Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये दोन प्रमुख आघाडीत तीव्र स्पर्धा आहे. ज्यामध्ये प्रत्येकी तीन-तीन पक्षांचा समावेश आहे. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन विभाजन असल्याने ही लढत अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने उभी राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत लोकांनी शरद पवार यांना जास्त पाठिंबा दिला होता. शिवसेनेच्या बाबतीतही उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांची स्पर्धा तितकीच तीव्र होती. त्यामुशे महाविकास आघाडी की महायुती हे २३ नोव्हेंबर नंतर स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कुणाला पाहायच, याबाबात सर्व्हे समोर आला.