
मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असून, राजकीय तापमान वाढत चालले आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षांनी प्रचारात जोरदार झुंज सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी मॅटराइज सर्व्हेने दिलेल्या अंदाजामुळे महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) या दोन्ही गटांचे भविष्य कसे असू शकते, याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.