Mahayuti CM: नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा बुधवारी..! निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी ठरवणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ?
Maharashtra Government Formation : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री बुधवारी निश्चित होईल, तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल चर्चा सुरू आहे. गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे.
मुंबई- नवी दिल्ली : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याचे गूढ येत्या बुधवारी (ता.४) उलगडणार असून त्याच दिवशी भाजपच्या नव्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने आज दिली.