
सोलापूर: सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा. हा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) मिळावा यासाठी चार नोव्हेंबर रोजी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहोत. आम्ही काँग्रेसला चार नोव्हेंबरपर्यंत मुदत देत आहोत. तोपर्यंत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ ‘माकप’ला न मिळाल्यास पाच नोव्हेंबरला खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट करू. त्यात काँग्रेसच्या चिंधड्या उठतील,’’ अशा शब्दांत ‘माकप’चे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आपला राग व्यक्त केला.