
मेहकर विधानसभा निवडणुकीतील चौरंगी संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. बुलढाणा जिल्ह्यातील या विशेष विधानसभा क्षेत्रात शिवसेना आणि ठाकरे गटाच्या अस्तित्वाची लढाई होती. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीदेखील मैदानात उतरल्या होत्या. एकेकाळी शिवसेनेचा मजबूत किल्ला असलेला मेहकर, आता दोन्ही शिवसेना गटांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय रायमुलकर तर ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांच्यात तगडी लढाई झाली.
या लढाईत ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात ४८१९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १०४२४२ मते मिळाली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय रायमुलकर यांना ९९ हजार मते मिळाली.