Monika Rajale : मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक, शिरसाठवाडी येथील प्रकार : राजळे यांच्यासह समर्थक जखमी
Pathardi Vidhan Sabha Election 2024: शिरसाठवाडी मतदान केंद्रावर मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे राजळे व त्यांचे समर्थक जखमी झाले. या घटनेनंतर राजळे यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
पाथर्डी : शिरसाठवाडी मतदान केंद्रावर आमदार मोनिका राजळे आल्या असता त्यांच्यावर आज सायंकाळी दगडफेक करण्यात आली. आक्रमक जमावापासून बचाव होण्यासाठी राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदान केंद्राच्या खोलीत कोंडून घेतले.