
चंद्रपूरः काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार, असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून कुणबी समाजातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.