Sunil Raut Won In Vikhroli Assembly Election : सुनील राऊतांनी गड राखला; विक्रोळीच्या विधानसभेवर ठाकरेंचा झेंडा

Vikhroli Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal : विक्रोळी मतदार संघात शिवसेना शिंदेकडून सुवर्णा करंजे आणि ठाकरेंकडून सुनील राऊत मैदानात उतरले होते.
Vikhroli
Vikhroliesakal
Updated on

Vikhroli Assembly Election 2024 Result : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या विक्रोळी विधानसभा मतदार संघात यावेळी दुहेरी लढत पाहायला मिळाली. विद्यमान आमदार सुनिल राऊत यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती. तर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सुवर्णा करंजे यांना मैदानात उतरवले होते. पण, सुवर्णा करंजेंच्या आव्हानासमोर १५५२६ मंताच्या आघाडीने सुनील राऊत विजयी झाले.

सुवर्णा करंजेना ५०५६७ मते मिळाली. तर, सुनील राऊतांनी ६६०९३ मते घेत बाजी मारली. मनसेनेही विश्वजित ढोलम यांच्या रूपाने नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना १६८१३ मतांवर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com