

नागपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर मतदारसंघात बसपने बुद्धम राऊत यांना उमेदवारी दिली. मात्र बाहेरून वेळेवर आयात करण्याची बसपची सवय गेली नाही. अचानक मनोज सांगोळे यांना बसपने एबी फार्म देऊन उमेदवारी अर्ज सादर केला आणि बुद्धम राऊत यांनी उशिरा अर्ज भरल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. यामुळे बसपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज सांगोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.