
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा आहे. कारण या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस गेल्या तीन निवडणुकांमध्ये विजयी ठरले आहेत. मात्र, यंदा काँग्रेसने प्रफुल गुडधे यांना मैदानात उतरवले होते, त्यामुळे निवडणूक रंगतदार झाली. तरी देखील महायुतीचे किंग मेकर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात 39710 मतांनी विजय मिळवला आहे.