
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली. काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे, भाजपचे सुधाकर कोहळे, वंचित बहुजन आघाडीचे यश गौरखेडे, बहुजन समाज पार्टीचे प्रकाश गजभिये आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते.
विकास ठाकरे यांनी गेल्या वेळी सात हजारांच्या कमी मतांनी विजय मिळवला होता, त्यामुळे भाजपला यंदा आपले गड परत मिळवण्याची अपेक्षा होती. मात्र विकास ठाकरे 6173 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी आपला गड कायम राखला आहे.