

वणी : येत्या 20 नोव्हेंबरला होणार्या विधानसभा निवडणुकीचे नामांकन भरण्याला 22 आक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती व आघाडीचे उमेदवार कोण असणार याची वणी विधानसभा क्षेत्रातील मतदारांना उत्सुकता लागली आहे.