Shirala Assembly Election 2024 Results : राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला असताना पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विश्वजित कदम यांनी ३० हजार ६४ इतके मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यांनी भाजप महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून पलूस-कडेगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवला.
शिराळा विधानसभा क्षेत्रात शिराळा तालुक्यासोबत वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मानसिंगराव नाईक यांना महाविकास आघाडीतून तर, भाजपाच्या सत्यजीत देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती.