Political Stir in Parvati Constituency esakal
Maharashtra Election 2024 Result
Parvati Vidhan Sabha Nivadnuk: विधानसभेपूर्वी पुण्यात राजकीय वातावरण तापले! पर्वतीत लागले सांगली पॅटर्नचे फ्लेक्स, नेमकं रहस्य काय?
Parvati Constituency pune: पर्वती मतदारसंघातील या "सांगली पॅटर्न" फ्लेक्समुळे विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बागुल यांची अपक्ष उमेदवारी नक्कीच महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात मोठा तणाव पाहायला मिळतोय. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात "यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न" असे सांगणारे फ्लेक्स लावले गेले आहेत. या फ्लेक्समुळे मतदारसंघातील राजकीय चर्चा अधिकच पेटल्या आहेत. "सांगली पॅटर्न" म्हणजेच बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार निवडून येण्याची घटना लक्षात घेता, पर्वतीतील निवडणुकीत देखील असाच ट्रेंड दिसणार का, याची उत्सुकता वाढली आहे.