
बुलडाणा: केंद्र सरकारच्या १०० दिवसात केंद्रीय मंत्री या नात्याने केलेल्या कामांचा लेखाजोखा ना.प्रतापराव जाधव यांनी दिली. बुलडाणा येथील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये आज १ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आयुष मंत्रालयाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय घेतले. नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिल्याशिवाय जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर यावेळी ना. जाधव यांनी माहिती दिली.
पुढे बोलतांना ना. जाधव म्हणाले की, आधी आयुर्वेदिक औषधी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयुष औषधी केंद्र सुरू करण्यात येईल. जिल्हा रुग्णालयात आता अमृत स्टोअर सुरू करून तिथे उच्च दर्जाची औषधे सवलतीच्या दरात रुग्णांना पुरविण्यात येईल.
आरोग्याच्या दृष्टीने धनत्रयोदशीला मोठे महत्व आहे. त्या अनुषंगाने दिवाळीत प्रत्येक घरी धन्वंतरीची पूजा करून आरोग्यदायी जीवनाची प्रार्थना करावी, अशी अपेक्षा देखील ना. जाधव यांनी व्यक्त केली.
गेल्या १० वर्षात २२ एम्स रुग्णालये देशात उभी राहिलीत. २०१४ पूर्वी देशात ३८७ मेडिकल कॉलेज होते. आता ती संख्या ७७४ झाली.
आधी देशभरात मेडिकलच्या जागा ५१ हजार होत्या, आता त्यात वाढ होऊन १ लाख १५ हजार ८१२ अधिक ८०० एवढ्या मेडिकल जागा आता निर्माण झाल्या आहेत, असेही ना. जाधव म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र इथेही आता अनेक सुविधा निर्माण होत आहेत, असेही ना. जाधव म्हणाले.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.