Mukhed Assembly Elections 2024: महायुती सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली : मा.आ. बेटमोगरेकर

Mukhed Vidhan Sabha elections 2024: निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महिलांना लाडली बहीण योजना सुरु केली पण येथील महिला जागृत आहेत त्यांनी महायुती सरकारचा चेहरा ओळखला आहे.
 Mukhed Vidhan Sabha elections 2024
Mukhed Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

मुखेड: महायुती सरकारच्या कारभाराला येथील जनता कंटाळलेली आहेत यात सर्वात ज्यास्त शेतकरी, युवा त्रस्त आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महिलांना लाडली बहीण योजना सुरु केली पण येथील महिला जागृत आहेत त्यांनी महायुती सरकारचा चेहरा ओळखला आहे.

येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवतील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय असेल दुष्काळाचे पैसे असतील त्याचबरोबर परवाच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले आहे याचे आजपर्यंत पंचनामे होत नाहीत ही खंत माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी व्यक्त केले.

शहरातील काँग्रेस कार्यालयात रविवारी ( ता २२)आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, तालुका अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, शहराध्यक्ष हणमंतराव नारनाळीकर, बाळासाहेब गोमारे, दिलीप कोडगिरे, शिवलिंग पाटील कामजळगेकर, विशंभर पाटील मसलगेकर, संदीप पाटील इटग्याळकर, बाळासाहेब पुंडे, संदिप पा. निवळीकर, दिनेश अप्पा आवडके, अभिजीत पाटील बेटमोगरेकर इत्यादी उपस्थित होते.

 Mukhed Vidhan Sabha elections 2024
Nandurbar Vidhan Sabha Election 2024: लोकसभेतील एकसंघ एकमेकांसमोर उभे ठाकणार! कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात महायुती आजमावणार नशीब

पुढे बोलताना बेटमोगरेकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार कै.वसंतराव चव्हाण यांना येथील मतदाराने भरघोस मतदान देऊन निवडून दिले यामुळे मी मतदारसंघातील १२२ गावात मतदारांचे आभार व संवाद यात्रा काढली होती.

येथील नागरिकांनी मला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी ठेवण्यासाठी व माझ्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे सांगितले त्यामुळे येत्या निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार राहणार असून ही निवडणूक सर्व ताकतीनुसार लढवणार असल्याचे सांगितले तर येत्या २५ तारखेला शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात शोक सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com