Rajapur Assembly Election 2024 Results : रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंतांचं वर्चस्व कायम राहिलं आहे. उदय सामंत हे सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. या शिवाय, राजापूर मतदार संघातून नवखे असलेले त्यांचे बंधू किरण सामंत हे देखील चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहे. त्यांनी विद्यमान आमदार राजन साळवी यांचा पराभव केला आहे.
प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पांसह स्थानिक विकासाचा मुद्दा, महाविकास आघाडीमध्ये झालेली बंडखोरी आदी विविध मुद्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चर्चेत राहिलीये. गतवेळच्या निवडणुकीतील पराभूत झालेले अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांच्या आव्हानाने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अशा स्थितीतही सलग तिसर्यांदा आमदार राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्यामध्येच खरी लढत होती.