
श्रीगोंदे : श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. विरोधकांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले, म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांनी विकासकामांत टक्के घेतले ते मतदारसंघाचा विकास काय करणार, असा सवाल नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.