
राळेगाव विधानसभा मतदारसंघातील निकालांवर सर्वांचे लक्ष लागले होते. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. डॉ. अशोक उईके आणि काँग्रेसचे वसंत पुरके यांच्यात थेट लढत झाली. यावेळी मतदारांनी कोणावर विश्वास टाकला, याची उत्सुकता सर्वांना होती. राळेगाव विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवत काँग्रेसला तिसऱ्यांदा मोठा धक्का दिला आहे. भाजपचे प्राचार्य अशोक उईके 2753 मतांनी विजयी झाले आहेत.
या निकालामुळे भाजपची या भागातील वाढती लोकप्रियता दिसून आली, तर काँग्रेसला भविष्यात अधिक मजबूत तयारी करण्याची गरज भासणार आहे.