Vinayak Rautesakal
Maharashtra Election 2025 Result
Ratnagiri Election Politics : राऊत 'त्या' मताधिक्याची परतफेड करणार का? बाळ मानेंच्या वेगळ्या चुलीचं काय?
Ratnagiri Assembly Election Politics : सामंत राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्षपद भूषवत असताना या मतदारसंघात निवडणूक जिंकणे सोपे नव्हते.
Summary
ठाकरे गट व बाळ माने गटाच्या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
पावस : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर प्रथमच लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाल्यामुळे भाजपमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आली असे वाटत असताना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये (Ratnagiri Assembly Constituency) विनायक राऊत (Vinayak Raut) यांची भूमिका काय, यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. लोकसभेवेळी झालेल्या मदतीची परतफेड राऊत करणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

