
कारंजा : भाजप रेटून खोटे बोलणारा पक्ष असून त्यांचे सरकार शेती व शेतकरी विरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवा नेते रोहित पवार यांनी केले. कारंजा येथील आठवडी बाजार परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवार मयुरा काळे यांच्या समर्थनात जाहीर सभेत ते बोलत होते.