
Aditya Thackeray: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जो पक्ष बाबरी मशीद पाडणाऱ्यांचा सन्मान करतो, त्याच्यासोबत आम्ही काम करणार नाही, असं म्हणत आझमींनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी आझमींवर कडाडून टीका करत ते भाजपची बी टीम आहेत, असं म्हटलं होतं.