माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे (Sangamner Assembly Constituency) सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले.
-राजू नरवडे
संगमनेर : राज्यातील संयमी नेते आणि काँग्रेसशी कायम एकनिष्ठ असलेले दिग्गज नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला. यातून त्यांचे समर्थक अजूनही सावरत नाहीये. निकालाच्या दिवसापासून निर्भेळ प्रेमापोटी राज्यभरातील कार्यकर्त्यांची संगमनेरातील सुदर्शन निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली आहे. हा पराभव अशक्यच आहे, असे म्हणताना अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू निघत असल्याचे पाहायला मिळते. यावरून थोरात यांचा राज्यभर असलेला दांडगा जनसंपर्क आणि जुळलेली नाळची प्रचिती दिसून येते.