Sangli Assembly Election Vishal Patilesakal
Maharashtra Election 2025 Result
Vishal Patil : 'वसंतदादा घराण्याविरोधात कुटिल डाव खेळले जाताहेत, काँग्रेसनिष्ठा दाखविण्यासाठी परीक्षा द्यावीच लागते'
Sangli Assembly Election Vishal Patil : "काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न मित्रपक्षांकडून केला जातो. मात्र, तेच लोक आम्हाला आता निष्ठा सांगत आहेत."
Summary
"आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. मात्र, अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी पुढे येतात."
सांगली : ‘‘सांगली जिल्ह्यात काँग्रेस (Congress) वाढवण्याचे काम वसंतदादा घरण्याने केले आहे. याच घराण्याविरोधात अनेक कुटिल डाव खेळले जातात. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत घडत आहे. आमची काँग्रेसनिष्ठा दाखविण्यासाठी परीक्षा द्यावी लागते,’’ ही खंत खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सभेत बोलून दाखविली. ‘‘मतदारसंघाबाहेरील शक्तींकडून या त्रासदायक खेळी खेळल्या जात आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील भाजपचा पराभव करण्यासाठी जयश्री पाटील यांना साथ द्या,’’ असे आवाहनही खासदार पाटील यांनी यावेळी केले.
