Sawantwadi Assembly Election 2024 Results : सावंतवाडी जिल्ह्यातून मंत्री दीपक केसरकर यांचा विजय झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी राजन तेली यांना तब्बल ३९ हजार ८९९ मतांनी हरविले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये (Sawantwadi Assembly Constituency) मागच्या तीन टर्मचा विचार करता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) व राजन तेली या दोन चेहऱ्यांव्यतिरिक्त यावेळी विशाल परब आणि अर्चना घारे हे दोन नवीन चेहरे घराघरांत पोहोचले होते.