
शिर्डी : कोपरगाव आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात चुरशीचे सामने पहायला मिळतील. अशी अटकळ बांधली जात होती. या दोन्ही मतदारसंघांत चुरशीच्या सामन्यांची सराव आणि पूर्वतयारी जोरात सुरू होती. मात्र, ऐनवेळी जोरदार टक्कर देऊ शकणाऱ्या संघांनी मैदानात न उतरणे पसंत केले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील लढती तुलनेत अगदीच आळणी झाल्या आहेत.