
शिरपूर: शिरपूर विधानसभा मतदार संघावर गेल्या ४० वर्षापासून एकहाती वर्चस्व राखणाऱ्या आमदार अमरीशभाई पटेल यांनी आपला करिष्मा कायम असल्याचेच नव्हे तर त्यात मोठी वाढ झाल्याचे दाखवून दिले. त्यांचे खंदे समर्थक भाजपचे उमेदवार काशीराम पावरा तालुक्याच्या इतिहासातील सर्वाधिक विक्रमी मताधिक्य मिळवत सलग चौथ्यांदा आमदार झाले. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा एक लाख ४५ हजार ९४४ मतांनी पराभव केला.